कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे जिल्हा न्यायालयाने अॅड.सुरेंद्र गडलिंग यांना ठोठावली कोठडी

79

पुणे, दि. ७ (पीसीबी) – कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी नागपूर येथील अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पहाटे पुणे जिल्हा न्यायालयाने गडलिंग यांना ही कोठडी सुनावली.

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत आज पहाटे ५ वाजता कोर्ट उघडण्यात आले. यावेळी नक्षली कनेक्शनच्या संशयावरून अटक करण्यात आलेले सुरेंद्र गडलिंग यांना कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गडलिंग हे नक्षलवाद्यांचे वकीलपत्र घेत असून त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असावा असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.