कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही – रवींद्र कदम

150

पुणे, दि. ३ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद यांचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी म्हटले आहे.

दोन महिन्यांच्या तपासानंतर कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारात एल्गार परिषदेचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. मात्र एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा संबंध होता आणि माओवाद्यांनी त्यासाठी पैसा पुरवला, असा दावा रवींद्र कदम यांनी केला.

एल्गार परिषदेला जरी माओवाद्यांनी पैसा पुरवला असला तरी या परिषदेत सहभागी झालेले सर्वजणच माओवाद्यांशी संबंधित होते असे म्हणता येणार नाही, असेही रवींद्र कदम यांनी स्पष्ट केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात रवींद्र कदम बोलत होते.