कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला लुटले

149

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : पायी चालत जाणा-या तरुणाला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून हाताने व दगडाने मारहाण केली. त्यानंतर तरुणाचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री सव्वा अकरा वाजता क क्षेत्रीय कार्यालयासमोर एमआयडीसी भोसरी येथे घडली. रोहन राणुजी शिंदे (वय 22), विजय राजू तांगडे (वय 18, दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रदीप कुमार सुरेश प्रसाद सिंग (वय 30, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजता एमआयडीसी भोसरी येथील क क्षेत्रीय कार्यालयासमोरून पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने व दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले. आरोपींनी फिर्यादी यांचा 10 हजारांचा मोबाईल फोन आणि 1200 रुपये रोख रक्कम असा एकुकन 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare