कोथरुडमध्ये मित्रांनीच मित्राच्या डोक्यात बाटली मारुन केला खून

121

पुणे, दि. १० (पीसीबी) – मित्रांसोबत झालेल्या वादातून चौघांनी मिळून मित्राच्याच डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कोथरूड येथील चांदणी चौकातील कलाग्राम परिसरात सोमवारी रात्री उशीरा तीनच्या सुमारास घडली.

अक्षय झोरी ( वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा तीनच्या सुमारास अक्षय झोरी हा त्याच्या चार मित्रांसोबत कोथरुड येथील चांदणी चौकातील हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. यावेळी अक्षय याचा त्याच्या चार मित्रांसोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर ते चांदणी चौकातील जैन लोहिया आयटी पार्कजवळ आले असता,  या वादातून चौघांनी अक्षयला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. त्यात गंभीर जखमी होऊन अक्षयचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तिनही मित्रांना अटक केली आहे. मात्र एक जण अद्याप फरार आहे.