कोथरुडमध्ये मस्करी सहन न झाल्याने डोक्यावर बंदूक रोखून एकाला जीवेमारण्याची धमकी

133

पुणे, दि. २४ (पीसीबी) – मस्करी सहन न झाल्याने एका तरुणाच्या डोक्यात बाटली मारुन त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि.२३) रात्री उशीरा कोथरुडमधील सुतारदरा येथे असलेल्या राजे शिवराज मित्र मंडळाजवळ घडली.

रुपेश साठे असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश संतोष बोडके (वय १९), करण कैलास मोहोळ (वय १९), अजय कैलास मापारे (वय १९) आणि समीर उर्फ बंटी अंकुश पासलकर (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा कोथरुडमधील सुतारदरा येथील राजे शिवराज मित्र मंडळाजवळ जखमी रुपेश साठे आणि अजय मापारे काही मित्रांसोबत बसले होते. यावेळी रुपेशने अजयची मस्करी केली. यामुळे सोबतचे सर्व मित्र हसायला लागले. ही मस्करी सहन न झाल्याने अजयने बाटली फोडून रुपेशच्या डोक्यात मारली तसेच जवळील बंदूक त्याच्या डोक्यावर तानली आणि त्याला जीवेमारण्याची धमकी दिली. कोथरुड पोलिस तपास करत आहेत.