कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच – उदयनराजे भोसले

440

सातारा, दि. १४ (पीसीबी) – न्यायालयाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे खासदार उदयनराजे  भोसले आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच आणि सातारा शहरातील गणपतींचे मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.

न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे, मी पळपुटा नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  दुसरीकडे डॉल्बी वाजवू न देण्याच्या भूमिकेवर पोलिसही ठाम आहेत. दोनच दिवसांपूर्वी साताऱ्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केली होती.

गणेशोत्सव शांततेत साजरा केला जाईल असा विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला होता. उच्च न्यायालयाच्या नियमांच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले होते, त्यामुळे आता डॉल्बी वाजणार की नाही हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.