कोढव्यातील मुंडके नसलेल्या धडाच्या खूनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश

250

पुणे, दि. २२ (पीसीबी) – कोढव्यातील राजपाल बिल्डर यांच्या मोकळ्या प्लॅाटवर कंपाऊंड लगतच्या खड्यात मंगळवारी (दि.१९) एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. खून केल्या नंतर आरोपीने मृताची ओळख पटू नये म्हणून मुंडके कापू नेले होते. या थरारक खूनाचा उलगडा करण्यात परिमंडळ चारच्या पोलिसांना यश आले आहे.

उमेश भिमराव इंगळे (वय २०, रा. अण्णाभाऊ साठे नगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी निजाम अजगर हाशमी (वय १८, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१९) कोढव्यातील राजपाल बिल्डर यांच्या मोकळ्या जागेत असलेल्या खड्यात एक मुंडके नसलेला पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच कोढवा पोलिसांनी घटना स्थळाची पाहनी करुन, मृतदेहाचे वर्णन करुन त्याबद्दलची माहिती कोणाला असल्याची ती द्यावी असे आवाहन केले होते. यावर या मृतदेहाशी सामय असलेली एक मिसींगची तक्रार बिबवेवाडी येथील सिमा हनुमंत इंगळे आणि त्यांचा जावाई गणेश खिल्लारे यांनी दिली होती. यावर त्यांकडे चौकशी केली असता मृत तरुण शनिवार (दि.१६) अप्पर रोड बिलाल मस्जिद जवळील फिटनेस फॉरएव्हर जिम येथील मिसिंग असल्याचे कळले. तसेच तो शेवटी आरोपी निजाम हाशमी सोबत दिसल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. यावर पोलिसांनी निजाम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता निजाम याचे उमेश याच्या एका नात्यातील मुलीशी प्रेम संबंध होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये सारखी भांडणे व्हायची यामुळे उमेशचा खून केल्याची कबूली निजामने दिली.

WhatsAppShare