कोच रवी शास्त्रीसमोर नव्या खेळाडूंचे ‘रॅगिंग’

72

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – भारतीय खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघात काही नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. या नव्या खेळाडूंची एक ‘ओळख परेड’ नुकतीच झाली. एकप्रकारे गंमतीतल रॅगिंगच होतं हे आणि विशेष म्हणजे टीमचे शिस्तप्रिय कोच रवी शास्त्रीही या चेष्टामस्करीत सहभागी झाले होते.

भारतीय संघाचा ओपनर शिखर धवन याने या थट्टामस्करीचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जुन्या खेळाडूंसमोर या नव्या खेळाडूंना खुर्चीवर उभे राहून आपली ओळख करून द्यायची होती.