कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस २०० फूट दरीत कोसळली!

31

सातारा, दि. २८ (पीसीबी) – कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस कोसळली. ही बस २०० फूट दरीत कोसळली आहे. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे ३८ कर्मचारी आणि २ चालक-वाहक असे एकूण ४० जण होते. त्यापैकी १० मृतदेह बाहेर काढळे असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.