कोकणात पर्यटणासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी; ६१ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

81

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – कोकणात पर्यटणासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. बंद दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच घरातील कपाटात ठेवलेले ७ ग्रॅम वजनी सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६१ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शुक्रवार (दि.७) सकाळी दहा ते रविवार (दि.९) सकाळी अकराच्या दरम्यान पिंपळे गुरव लक्ष्मीनगर येथील मातोश्री बिल्डींग मधल्या फ्लॅट क्र. १०० मध्ये घडली.

याप्रकरणी एका ४६ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.७) ते रविवार (दि.९) या कालावधीत पिंपळे गुरव लक्ष्मीनगर येथील मातोश्री बिल्डींग मधल्या फ्लॅट क्र. १०० मध्ये राहणारे गायकवाड कुटुंब कोकणात फिरायला गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी गायकवाडांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. तसेच घरातील कपाटात ठेवलेले ७ ग्रॅम वजनी सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६१ हजारांचा ऐवज चोरुन नेला. रविवारी गायकवाड कुटुंब घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. सांगवी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.