कोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण

169

पुणे, दि. १९ (पीसीबी) – कोंढव्यातील माणिकचंद मलबार हिल या अकरा मजली इमारतीमधील सहाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधे आज (रविवार) सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवीतहाणी झाली नसून घरातील दोघांना  सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहाच्या सुमारास कोंढव्यातील माणिकचंद मलबार हिल या अकरा मजली इमारतीमधील सहाव्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमधे अचानक आग लागली. ही बाब लुंकड रियाल्टी सिक्युरिटीचे इनचार्ज विलास पाटील व सिक्युरिटी ऑफिसर साजिद अत्तार यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने तेथे जावून फायर एक्टिंगविशरच्या साह्याने आग विझवण्याचा  प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाला कळविण्यात आले. तसेच फ्लॅटमधील दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेऊन आग विझवली.  आगीमुळे फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हॉलमधील साहित्य पुर्णपणे जखून खाक झाले आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता कोंढवा अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आली आहे.