कॉर्मेड गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या तिघांची हत्या एकाच पिस्तुलाने अमोल काळेची पोलिसांना माहिती

159

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – कॉर्मेड गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या तिघांची हत्या एकाच पिस्‍तुलाने केली. तसेच नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी एकाच दुचाकीचा वापर केला गेला, अशी कबुली या हत्या प्रकरणांतील आरोपी अमोल काळेने कर्नाटक एसआयटीला दिल्याची खळबळजनक माहिती सुत्रांनी दिली आहे. या माहितीच्या आधारावरूनच कर्नाटक एसआयटीचे पथक गाडीच्या तपासासाठी महाराष्‍ट्रात दाखल झाले आहेत.

आतापर्यंत झालेल्या तपासामधून अमोल काळे हाच पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा प्रमुख सुत्रधार होता हे स्पष्ट झाले नव्हते असे कर्नाटक एसआयटीतर्फे सांगण्यात आले आहे. अमोल काळेने दिलेल्‍या या माहितीमुळे या सर्व दिग्‍गजांच्‍या हत्येचे गुढ लवकरच उकलणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.