कॉमन पार्कींगमधून गाडी नेल्याने महिलेचे नाक केले फ्रॅक्चर

113

हिंजवडी, दि.२७ (पीसीबी) – कॉमन पार्कींगमधून गाडी नेली म्हणून 60 वर्षिय व्यक्तीने महिलेला आणि अन्य एकास हाताने मारहाण केली. त्यात महिलेचे नाक फ्रॅक्चर झाले. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी पावणे नऊच्या सुमारास मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली.

याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लक्ष्मण बबन मोहोळ (वय 60, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या कॉमन पार्किंगमधून त्यांची गाडी घेऊन जात होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला अडविले. तू येथून गाडी का घेऊन गेली, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेला व एकाला हाताने मारहाण केली. यात फिर्यादीच्या नाकास मार लागून नाक फ्रॅक्चर झाले. आरोपीने फिर्यादी महिलेला जखमी केले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare