केवळ कामाचे अपयश झाकण्यासाठी आणखी काही जण राष्ट्रवादीच्या संपर्कात; ‘या’ भाजपा नेत्याचा टोला

33

अहमदनगर,दि.२७(पीसीबी) – ‘केवळ कामाचे अपयश झाकण्यासाठी आणखी काही जण राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत, एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरासारख्या गोष्टी राजकारणात होत असतात. त्या काही मनावर घ्यायच्या नसतात, असं म्हणत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

माजी मंत्री बबनराव पाचपुते हे आज नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भाष्य केले. पाचपुते म्हणाले, ‘राजकारणात अशा गोष्टी होत असतात. त्या काही मनावर घ्यायच्या नसतात. नगरमधून आगामी काळात एखादा नेता, पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची सुतराम शक्यता नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आपल्या कामाचे अपयश झाकण्यासाठी त्यांच्याकडून अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात आहेत. परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. आगामी काळात राष्ट्रवादी कोणी जाणार नाही व तिथून कोणी येणार नाही. आता एकनाथ खडसे यांचा विषय थोडा वेगळा होता, म्हणून त्या विषयी जास्त बोलण्याची गरज नाही. असंही पाचपुते यांनी म्हटलं.

WhatsAppShare