केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्‍ट पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून

81

केरळ, दि. ६ (पीसीबी) – केरळमधील कासारगोड जिल्ह्यात एका मार्क्‍सवादी कम्युनिस्‍ट पक्षाच्या २३ वर्षीय कार्यकर्त्याचा चाकूने वार करुन खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारगोड जिल्‍ह्यात झालेल्या या हत्येणंतर परिसरात तणाव वाढला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून गुन्‍हेगारांची धरपकड सुरू आहे. दरम्यान, केरळमध्ये राजकीय हत्यांचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढले आहे. यापूर्वी भाजप आणि माकप कार्यकर्त्यांच्याही हत्या झाल्या आहेत. दोन्‍ही पक्ष एकमेकांवर याप्रकरणी आरोप करत आहेत.