केरळमध्ये मदतकार्यासाठी १०० हुन अधिक निरंकारी सेवादल रवाना

596

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – संत निरंकारी मिशनचे सेवादल, संत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक तसेच डॉक्टर, इलेक्टरीशीयन, गवंडी, प्लंबर, कारपेंटर केरळवासीयांच्या मदतीसाठी समोर आले आहे. सोमवारी (दि. ३) पुणे क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी यांच्या बरोबर केरळमध्ये मदकार्यासाठी १०० हुन अधिक जण रवाना झाले असून १० सप्टेंबरपर्यंत केरळवासीयांना सेवा देणार आहेत.

उत्तराखंड येथील प्रलयाच्या वेळी ही मंडळाने मदत कार्य निस्वार्थ भावनेने करून जनसेवा हीच ईश्वर सेवा याची शिकवण दिली आणि हेच संत निरंकारी मंडळाचे प्रतीक आहे. माळीण या ठिकाणी पोहोचून देखील संत निरंकारी मंडळाद्वारे याच प्रकारची जनसेवा करण्यात आली होती. जेव्हा हि नैसर्गिक आपत्ती समाजात निर्माण होते तेव्हा निरंकारी सेवादल त्याठिकाणी जाऊन आपली निष्काम सेवा निभावत असतात.पुण्यातून गेलेले सेवादलचे पथक १० सप्टेंबर पर्यंत हि सेवा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.