केजरीवालांचा मोफत वीज देण्याचा निर्णय आवडला – भाजप खासदार

221

नवी दिल्ली,दि.११(पीसीबी) – भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणलेली मोफत वीज योजना गरीब मतदारांना आवडली असल्याचं म्हटलं आहे.

रमेश बिधुडी यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना, “मतदार हे अरविंद केजरीवाल यांनी आणलेल्या विविध योजनांमुळे प्रभावित झाल्याचं म्हटलं आहे.” यावेळी त्यांनी अरविंद केजरीवालांचं कौतुक केलं आहे.

भाजप कार्यकर्ते केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले असते तर दिल्लीतील निकाल वेगळा लागला असता, असंही रमेश बिधुडी यांनी म्हटलं आहे.

WhatsAppShare