“केंद्र सरकारमुळेच देशात बेरोजगारी आणि महागाई”

65

मुंबई,दि.१४(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या ५ वर्षात देशातील बेरोजगारी आणि महागाई वाढतंच चालली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच महागाईचा भडका उडालाय, असा आरोप केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मंत्र्यांच्या बंगल्यांना लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी भाष्य केलं आहे. ते सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे तेच झालं पाहिजे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्यामुळे काँग्रेसच्या मुखपत्रावर बंदी घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली असल्याचंही सांगितलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात देशभरात निदर्शने केली. केंद्र सरकारमुळेच सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे, असा आरोपही सुप्रिया सुळेंनी यावेळी केंद्र सरकारवर केला आहे.