केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात, नाईक यांना गंभीर दुखापत, पत्नी विजया यांचा मृत्यू

1

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून, नाईक यांना गंभीर दुखापत झालीय. तसेच त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय. उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे ही घटना घडलीय. उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची गाडी पलटी झाली. या रोड अपघातात मंत्री श्रीपाद नाईक गंभीर जखमी झालेत, तर त्यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. ते उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व करतात.

नाईक हे माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री राहिले आहेत. अपघातानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ येथे हा अपघात झाला. नाईक आपल्या पत्नीसमवेत कुठेतरी जात होते, त्याचदरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांची पत्नी बराच काळ बेशुद्ध राहिली, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर गोव्यात उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केलाय.

 

WhatsAppShare