केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रुग्णालयात येऊन आमदार जगतापांच्या प्रकृतीची केली विचारपूस

131

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे गेले महिनाभर बाणेर येथील ज्युपीटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून अनेक मान्यवर त्यांची विचारपूस करीत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रुग्णालयात येऊन आमदार जगतापांच्या प्रकृतीची आज (ता. 15) विचारपूस केली. हा लोकनेता लवकरच सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होईल, असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला.

लवकर बरे व्हा, असे राणे या भेटीत आमदार जगताप यांना म्हणाले. आमदार जगताप हे लोकनेते आहेत. त्यामुळे ते लोकांपासून फार काळ दूर राहू शकणार नाहीत. लवकरच ते सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होईल, असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी आमदार जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर आणि उद्योजक विजय जगतापांकडून उपचाराबाबत अधिक माहिती घेतली.