केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह

2

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांनी स्वत:च ट्वीटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

त्यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।

“कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसल्यानंतर मी कोरोना चाचणी केली. माझ्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती स्थिर आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या माणसांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी आहे”, असं अमित शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता या यादीत थेट केंद्रीय गृहमंत्र्यांचं नाव समाविष्ट झालं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने अमित शाह अयोध्या इथं होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत.

WhatsAppShare