केंद्राचे ४० हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाले – अनंत हेगडे

110

मुंबई,दि.२(पीसीबी) – केंद्र सरकारचे ४० हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री बनले असा दावा भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. भाजपकडे बहुमत नसतानाही फडणवीस मुख्यमंत्री का बनले असा सवाल आत्तापर्यंत उपस्थित करण्यात येत होता. त्यामागे कारण होते असा दावा हेगडेंनी केला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केंद्राचे ४० हजार कोटी होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले असते तर त्यांनी ४० हजार कोटींचा दुरुपयोग केला असता, त्यामुळेच फडणवीस यांना ८० तासांचे मुख्यमंत्री व्हावं लागलं असा दावा हेगडेंनी केला आहे.

१५ तासांत मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या फडणवीसांनी ४० हजार कोटी योग्य ठिकाणी पोहोचवले असा दावाही हेगडेंनी केलाय.