केंद्राकडे पूरग्रस्त भागांसाठी ६८०० कोटींची मदत देण्याची मागणी – मुख्यमंत्री

103

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – पूरग्रस्त भागांसाठी ६ हजार ८०० कोटींची मदत द्या, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी आज (मंगळवार)  मुंबईत  पत्रकार परिषदेत  दिली.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा असा एक भाग असेल. तर  कोकण, नाशिक  आणि उर्वरित महाराष्ट्राचा दुसरा भाग असेल.  कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०० कोटी तर उर्वरित भागांसाठी २१०० कोटींची मदत देण्याची मागणी केली आहे,  असे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.

पूरग्रस्त भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुरामध्ये  पडलेली, वाहून गेलेली  घरे सरकार  बांधून देणार आहे,  असेही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर ओसरू लागला आहे. पुणे- बंगळुरू महामार्ग सुरू झाला आहे.