कॅमेरा आणि लेन्स भाड्याने नेली; पण घडले ‘असे’ की कॅमेरा मालकाने केला गुन्हा दाखल

0

भोसरी, दि. 12 (पीसीबी) : कॅमेरा आणि लेन्स भाड्याने नेली. ती परत न देता व्यावसायिकाची फसवणूक केली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार फुगेवाडी जकात नाका येथे शनिवारी (दि. 9)सकाळी घडला.

सौरभ प्रभाकर सोनवणे (वय 22, रा. वाघोली), करण शिवराम राठोड (वय 20, रा. लोणीकाळभोर, मूळ रा. यवतमाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत योगीराज प्रकाश गायकवाड (वय 17, रा. हडपसर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांचा विश्वास संपादन करून आरोपी सौरभ आणि करण या दोघांनी एक लाख 80 हजारांचा एक कॅमेरा आणि त्याची लेन्स भाड्याने पाहिजे म्हणून नेली. ठरलेल्या वेळेत कॅमेरा आणि लेन्स न देता दोघांनी फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare