कॅनडातील भारतीय हॉटेल बॉम्बने उडवले

195

कॅनडा, दि. २५ (पीसीबी) – कॅनडातील टोरंटो शहरात असलेल्या एका भारतीय हॉटेलात गुरुवारी रात्री मोठा स्फोट झाला. त्यात १५ जण जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. रेस्तराँमध्ये आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा स्फोट घडवून आणल्याचा स्थानिक पोलीसांचा संशय आहे.

टोरंटो शहराजवळील मिसीसॉगा येथील ‘बॉम्बे भेल’ या भारतीय रेस्तराँमध्ये गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्फोट झाला. घटनास्थळी दोन अज्ञात व्यक्ती संशयास्पदरित्या दिसले होते. त्यांनीच हा स्फोट घडवून आणला असावा, असा पोलीसांचा संशय आहे. घटनेनंतर ते ताबडतोब तेथून पळून गेले. पोलीसांनी या दोन्ही संशयितांची वर्णने जाहीर केली आहेत. सध्या तरी या स्फोटाचे अद्याप कोणतेही दहशतवादी कनेक्शन समोर आले नाही.