कृष्णा सुतारची ‘ऍडोब चॅम्पियनशिप’च्या अमेरिकेतील स्पर्धेसाठी निवड

154

पुणे, दि. १६ (पीसीबी) – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार  कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्टस्  ‘च्या ४० विद्यार्थ्यांनी   ‘ऍडोब चॅम्पियनशिप ‘स्पर्धेत  भाग घेतला  . फोटोशॉप ट्रेनिंग प्रोग्रॅम अंतर्गत झालेल्या  स्पर्धेत   या विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला .

या स्पर्धेत कृष्णा सुतार या विद्यार्थिनीला सर्वाधिक गुण मिळवून ती आता या चॅम्पियनशिप च्या पुढील टप्प्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे . ही स्पर्धा  २०२० मध्ये अमेरिकेत होणार आहे .

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम आणि  कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्टस्  चे प्राचार्य डॉ ऋषी आचार्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . यावेळी एस  बी एच इनामदार ,झुबेर शेख ,हर्षद सांगळे इत्यादी उपस्थित होते .