‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे -आशिष शेलार यांच्यात खलबते

0
630

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’वर जाऊन आज (शनिवार) सकाळी भेट घेतली. या भेटीचा तपशील अद्याप समजलेला नाही. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  

यावेळी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबतची माहिती मिळालेली नाही.  दरम्यान, मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने याभेटी मागचे कारण दिलेली नाही. दरम्यान भाजपच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या या गुप्त भेटीमागे नक्की कोणते कारण आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राज ठाकरे हे मनसेचे पक्षप्रमुख, तर आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत.  त्यामुळे राजकारणातील दोन महत्त्वाच्या पदांवरील या नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.