कुदळवाडी, बिजलीनगर, दापोडी, रहाटणी, भोसरी, काळेवाडी, आनंदनगरला नव्याने कोरोना रुग्ण

178

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतेच आहे. शहरात राहणारे परंतु पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २० रुग्णांसह आज पिंपरी चिंचवडमधील एकूण रुग्ण संख्या २८५ पर्यंत पोहचली. कुदळवाडी, बिजलीनगर, दापोडी, रहाटणी, भोसरी, काळेवाडी, आनंदनगरला नव्याने कोरोना रुग्ण आढळून आले.

महापालिकेने दिलेल्या प्रसिध्दीपत्रात शहरात आज १४ बाधित रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या १६०, उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या ७८, शहराबाहेरील परंतु इथे उपचार घेणारे २० असे सर्व बाधिक ३०० च्या पुढे आहेत. मृतांची संख्या १६ पर्यत पोहचली आहे. अद्याप ३७६ लोकांचा अहवाल बाकी आहे. एकूण सँम्पल ५,१२४ आणि अहवाल प्राप्त ४,७४८ आहे. घरातच अलगीकरण केलेल्यांची संख्या १०,०३३ आहे.

WhatsAppShare