कुदळवाडीतील भैरवनाथ महाराज मंदिराच्या सीमाभींतीची दुरूस्ती करा – दिनेश यादव

33

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – चिखलीगावचे ग्रामदैवत कुदळवाडीतील श्री भैरवनाथ महाराज मंदिराच्या  सीमाभिंतीची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी ही भींत खचली आहे. त्यामुळे मंदिराच्या सीमाभिंतीची दुरूस्ती करावी, अशी मागणी प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात दिनेश यादव यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “चिखलीगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचे कुदळवाडीत मंदिर आहे. हे मंदिर चिखली परिसरात राहणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या भोवतीने काही वर्षांपूर्वी सीमाभींत बांधण्यात आली आहे. आता या सीमाभींतीची पडझड झाली आहे. भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून, ती खचली आहे. त्यामुळे ही भींत पडून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सीमाभींतीची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”