कुख्यात डॉन अबू सालेमने संजू चित्रपटाच्या निर्मात्यांना बजावली नोटीस

428

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – संजू चित्रपटात दाखवलेल्या दृष्यामुळे कुख्यात डॉन अबू सालेमचे चांगलेच धाबे दणाणल्याचे दिसत आहे. त्यामुळे अबू सालेमने संजूच्या निर्मात्यांना आपल्या वकिला मार्फत नोटीस बजावली आहे.

अबू सालेमने या चित्रपटात चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अबू सालेमने ही नोटीस बजावली आहे.  १५ दिवसात निर्मात्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात बदनामी केल्याचा खटला दाखल करण्यात येणार असल्याचेही त्याने या नोटीसमध्ये नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.