कुख्यात गुंड बाळू वाघेरे याने २५ लाखांच्या खंडणीसाठी हॉटेल व्यावसायिकाला धमकावले

504

चाकण, दि. १५ (पीसीबी) – कुख्यात गुंड बाळू वाघेरे, रामनाथ सोनवणे आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांनी मिळून चाकण येथील एका हॉटेल व्यावसायिकाला २५ लाखांची खंडणी मागीतली. तसेच ती न दिल्यास जीवे मारण्याच धमकी दिली आहे. ही घटना मंगळवार (दि.१४) दुपारी तीन ते चारच्या दरम्यान नाणेकरवाडी चाकण येथे घडली.

याप्रकरणी गणेश शांताराम जाधव (वय ३५, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळू वाघेरे, रामनाथ सोनवणे आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांचे दाजी रमन पवार यांचे ब्ल्यु वॉटर नावाचे हॉटेल आहे. मंगळवार दुपारी तीन ते चारच्या दरम्यान गणेश हे या हॉटेवर असताना आरोपी बाळू वाघेरे, रामनाथ सोनवणे आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांनी या हॉटेलवर जाऊन गणेश यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावले. तसेच ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपींनी फोनव्दारे आणि रस्त्यात गाडी अडवून देखील धमकावल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. पोलीस उपनिरीक्षक डुबे तपास करत आहेत.