किवळे ब्रीज येथे रिक्षाचालक आणि प्रवाशाला मारहाण करुन चोरट्यांनी पळवला ९ हजारांचा ऐवज

100

देहुरोड, दि. १२ (पीसीबी) – किवळे ब्रीज येथे लघुशंकेसाठी थांबलेल्या एका रिक्षाचालकासह त्यातील प्रवाशाला दोघा चोरट्यांनी मारहाण करुन त्या दोघांजवळील २ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल आणि ७ हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना सोमवार (दि.१०) रात्री नऊच्या सुमारास किवळे ब्रिज येथे घडली.

याप्रकरणी सिताराम गंगाराम राठोड (वय २५, रा. गेटवे सिमेंट प्लॉट, पुनावळे, ता. मुळशी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंकर लक्ष्मण दाते (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिताराम हे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास किवळे ब्रिज येथून रिक्षाने चालले होते. लघुशंकेसाठी त्यांनी तेथे रिक्षा थांबवली असता आरोपी शंकर आणि त्याचा एक साथीदार तेथे आला. त्यांनी सिताराम आणि रिक्षाचालकाला मारहाण केली. तसेच त्या दोघांजवळील २ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल आणि ७ हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शंकर याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.