किरीट सोमय्यांसह आणखी 28 भाजप नेत्यांची प्रकरणं उघड करणार

72

मुंबई, दि. ११ (पीसीबी) -| महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात भाजप आणि शिवसेनेत टोकाचा वाद होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. अशात राऊतांच्या एका वक्तव्यानं चर्चांणा उधाण आलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांसह आणखी 28 भाजप नेत्यांची प्रकरणं उघड करणार असल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केला आहे. त्यानंतर राज्यात वाद वाढला आहे.

ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात असणारा मोतीलाल ओसवाल कंपनीकडून सोमय्यांच्या प्रतिष्ठाणला लाखो रूपये मिळाल्याचं राऊत यांनी सांगितलं.एनसीएलमध्ये 5600 कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. मोतीलाल ओसवाल कंपनीवर कारवाई करण्यासाठी पहिल्यांदा सोमय्यांनी आवाज उठवला होता पण नंतर त्यांच्या प्रतिष्ठाणला लाखो रूपये ओसवाल यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांनी दोन दिवसांपूर्वीच राऊतांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता सोमय्यांवर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सोमय्यांच्या प्रतिक्रियेला महत्त्व प्राप्त झालं आहे.