किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार

115

देहूरोड, दि. १७ (पीसीबी) – रागाने बघितल्याच्या कारणावरून टोळक्याने मिळून एकावर चाकूने वार केले. तर दुस-यावर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १४) रात्री सात वाजता देहूरोड येथे लक्ष्मीपूरम सोसायटीच्या समोरील गार्डनमध्ये घडली.

दोन अल्पवयीन मुले, कार्तिक टाक आणि इतर अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष (पूर्ण नाव माहिती नाही), तनुष टाक, रोहन (पूर्ण नाव माहिती नाही) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी आशिष याच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आशीष, त्याचा मित्र तनुष टाक, रोहन हे तिघेजण खेळत होते. तिथे आरोपी आले. त्यांनी आशिष याला ‘काल तू आमच्याकडे रागाने का बघितले’ असे म्हणून आशिष आणि तनुषवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यांनतर रोहन याला हातापायाने मारून जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.