किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

167

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – मुलीसोबत भांडण झाल्याने त्या भांडणाबाबत विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पती, पत्नीला शिवीगाळ करत पती आणि मुलाला दगडाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी सहा वाजता लालटोपीनगर, पिंपरी येथे घडली.

जफुरुल समशेर खान (वय 40, रा. लालटोपीनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 13) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शांताराम बटई (वय 40), संगीता बटई (वय 35, दोघे रा. लालटोपीनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लहान मुलीचे भांडण आरोपी यांच्या मुलासोबत झाले. त्याबाबत फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी आरोपींकडे विचारपूस करण्यासाठी गेले. त्याचा राग आल्याने आरोपी शांताराम याने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीस शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला दगडाने मारून जखमी केले. पोलीस हवालदार उत्तम तरंगे तपास करीत आहेत.