किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण; कारचे नुकसान

58

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – बेकायदेशीररीत्या जागेत प्रवेश करून पत्र्याच्या शेडमध्ये बसलेल्या चौघांना जागा मालकाने जाब विचारला. यावरून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच जागा मालकाच्या कारचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

अरुण नामदेव पाचरूपे (वय 42, रा. पिंपळे गुरव), बदाम कांबळे अशी जखमींची नावे आहेत. अरुण यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर कांबळे, गोरख सुपे आणि अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण यांनी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे पवना नदीच्या किना-यावर तोंडी कराराने जागा घेतली आहे. त्या जागेत एक पत्र्याचे शेड आहे. रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी बेकायदेशीरपणे जागेत आले आणि पत्र्याच्या शेडमध्ये बसले. अरुण यांनी आरोपींना त्यांच्या जागेत येण्याचे कारण विचारले. याचा राग आल्याने आरोपींनी अरुण यांना शिवीगाळ करून दगड व विटांनी मारहाण केली. तसेच अरुण यांच्या स्कोर्पिओ कारवर (एम एच 12 / डी एस 2469) आरोपींनी दगडफेक करून कारचे 25 हजार रुपयांचे नुकसान केले. कारमध्ये बसलेल्या बदाम कांबळे यांना दगडफेकीत दुखापत झाली. आरोपींनी बदाम कांबळे यांनाही कारच्या खाली उतरवून मारहाण केली.

आरोपींनी फिर्यादी अरुण आणि त्यांचा मित्र बदाम कांबळे या दोघांचे मोबईल फोन गटारीत टाकून दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare