किरकोळ कारणावरून टेम्पो चालकावर ब्लेडने वार

38

निगडी, दि. १८ (पीसीबी) – टेम्पोत हवा भरल्यानंतर त्याच्या पैशांवरून वाद घालत गॅरेज दुकानदार आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून टेम्पो चालकाला मारहाण केली. तसेच ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री आठ वाजता जुना जकात नाका भक्ती शक्ती चौक निगडी येथील टायरच्या दुकानासमोर घडली.

सलाउद्दीन शेख, रफिक शेख, अतिक शेख (सर्व रा. पीसीएमसी वसाहत, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित विलास कांबळे (वय 27, रा. साईनगर, पुनावळे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो चालक आहेत. रविवारी रात्री आठ वाजता ते त्यांच्या टेम्पोची हवा चेक करण्यासाठी आरोपी सलाउद्दीन याच्या दुकानावर गेले. हवा चेक केल्यानंतर त्याचे पैसे सलाउद्दीन याने फिर्यादी कांबळे यांच्याकडे मागितले. त्यावरून त्यांच्यावर वाद झाला. आरोपींनी कांबळे यांना लोखंडी रॉड, धारदार ब्लेडने मारहाण करून जखमी केले. पोलीस नाईक दीपक टेंकाळे तपास करीत आहेत.