काॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर

263

पुणे, दि. १८ (पीसीबी) – कॉसमॉस बँकेचे पेमेंट सर्व्हर हॅक करून सुमारे ९४ कोटी ४२ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यासाठी २८ देशांतील १२ हजार व्यवहार प्रत्यक्ष एटीएम केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. भारतात करण्यात आलेल्या २५०० व्यवहारांत रक्कम काढण्यासाठी केल्हापूर, पुणे, मुंबई, हैदराबाद, इंदूरसह देशभरतील महत्त्वपूर्ण शहरातील एटीएमचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत.

सायबर क्राइम सेलच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी काॅसमाॅस बँकेच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली अाहेच. गुन्ह्यावेळी नेमकी काेणत्या ठिकाणावरून अाणि कोणत्या वेळी व्यवहार झाले याची बँकेकडे सविस्तर माहिती उपलब्ध असून त्याअाधारे पाेलिस अाराेपींचा माग काढण्यासंदर्भात चाचपणी करत अाहेत.

दरम्यान, पुण्यातील चांदणी चाैक, नरपीतनगर चाैक या ठिकाणच्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयित घटनेच्या दिवशी पैसे काढताना दिसून अाले आहेत. त्यादृष्टीने संशयितांची माहिती काढण्याचे काम पथक करत अाहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाेलिसांनी खासगी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली असून बँकेनेही सर्व्हर नेमके कशा प्रकारे हॅक झाले याबाबत तपासासाठी विदेशी न्यायवैद्यक यंत्रणेस पाचारण केले अाहे.