काही मराठा  समन्वयकांची महामंडळे  देण्याची मागणी; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

323

मुंबई, दि. ३ (पीसीबी) –  मराठा आंदोलकांच्या हेकेखोर स्वभावामुळे  मराठा आरक्षण रखडल्याचा दावा करणारी आमदार नितेश राणे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे हे संभाषण आपलेच असल्याची कबुली नितीश राणे यांनी दिली आहे. तर काही समन्वयकांनी महामंडळे आणि इतर मागण्या घेऊन आले होते. मात्र, आम्ही त्यांना विरोध केला. कारण मुख्य मागणी मराठा समाजाविषयी असेल, असा दावाही नितेश राणेंनी केला आहे.

मराठा संघटनेच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यासोबत झालेल्या या संवादामध्ये नितेश राणे यांनी मराठा संघटनांमधील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक जाणूनबूजून टाळल्याचा आरोप केला आहे. मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांना दगा दिला.  तर काही समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचा गौप्यस्फोटही या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.

ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर ती आपलीच असल्याची कबुलीही नितेश राणे यांनी दिली आहे. ‘जी सत्य परिस्थिती होती, ती मी सांगत होतो. त्यात काहीच चुकीचे नाही,  असेही नितेश म्हणाले. परळीहून काही जण महामंडळे आणि इतर मागण्या घेऊन आले होते. मात्र, आम्ही त्यांना विरोध केला. कारण मुख्य मागणी मराठा समाजाविषयी असेल, असा दावाही नितेश राणेंनी केला.