काही मराठा  समन्वयकांची महामंडळे देण्याची मागणी; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

62

मुंबई, दि. ३ (पीसीबी) –  मराठा आंदोलकांच्या हेकेखोर स्वभावामुळे  मराठा आरक्षण रखडल्याचा दावा करणारी आमदार नितेश राणे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे हे संभाषण आपलेच असल्याची कबुली नितीश राणे यांनी दिली आहे. तर काही समन्वयकांनी महामंडळे आणि इतर मागण्या घेऊन आले होते. मात्र, आम्ही त्यांना विरोध केला. कारण मुख्य मागणी मराठा समाजाविषयी असेल, असा दावाही नितेश राणेंनी केला आहे.