काही जण बोलघेवडे असतात, त्यांना नुसत्या सभा जिंकायच्या असतात ; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

96

पुणे, दि. १२ (पीसीबी) – गेल्या ६० वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आज (रविवार) केला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते. राज ठाकरेंच्या या प्रश्नाला अजित पवारांनी आपल्या शैलीत उत्तर देताना काही जण बोलघेवडे असतात.  ते काहीच करत नाही. त्यांना केवळ सभा जिंकायच्या असतात, असा टोला  लगावला.

पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अजित पवार बोलत होते.