कासारवाडीत रेल्वेच्या धडकेत अज्ञाताचा मृत्यू

236

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) सकाळी नऊच्या सुमारास घडली.

मयत इसमाची सायंकाळी उशीरा पर्यंत ओळख पटू शकलेली नाही.

रेल्वे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थाकाजवळ  रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३८ वर्ष, अंगात पांढऱ्या रंगाचा फूल शर्ट, निळसर रंगाची फूल पॅन्ट, उंची पाच फूट चार इंच, चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने सडपातळ, केस काळे, दाढी वाढलेली आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.