कासारवाडीत मद्यप्राशन केलेल्या महिलेची गळफास घेत आत्महत्या

175

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पतीसोबत भांडण झाल्याच्या रागातून मद्यप्राशन केलेल्या पत्नीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास सुखवानी पॅराडाईज, शास्त्रीनगर कासारवाडी येथे घडली.

सिंधू नामदेव शिंदे (वय ३४, रा. सुखवानी पॅराडाईज, शास्त्री नगर, कासारवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सिंधू आणि नामदेव हे पती-पत्नी आहेत. शुक्रवारी (दि.१७) त्यांनी राहत्या घरात  एकत्रित मद्यप्राशन करुन जेवण केले. जेवणानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणानंतर दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपले. भांडणाच्या रागातून सिंधू यांनी फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. नामदेव यांनी त्यांना तात्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.