कासारवाडीत भाच्याने केली पोलिसमामाला मारहाण

333

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – दारुड्या भाच्याने त्याच्या पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या पोलिसमामाला बेदम मारहाण करुन त्यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर केले आहे. ही घटना सोमवारी (दि.६) रात्री अकराच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.

भुजंग नागनाथ देडे (वय ४०, रा. पोलिस लाईन, खडकी) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात भाचा नागनाथ उर्फ पिंट्या वाघमारे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकराच्या सुमारास नागनाथ वाघमारे हा दारु पीऊन कासारवाडी येथे भुजंग यांच्याकडे आला होता. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. तसेच नागनाथ याने भुजंग यांना जबर मारहाण करुन त्यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर केले. भुजंग हे सध्या दिघी पोलिस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात नागनाथ विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिस तपास करत आहेत.