कासारवाडीत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून पळवल्या ६५ हजारांच्या सिगारेट

81

कासारवाडी, दि. १३ (पीसीबी) – दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजारांच्या सिगारेट चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. १२) सकाळी पावणेअकराच्या सुमारास कासारवाडीतील सुखवानी पॅराडाईज या दुकानात घडली.

याप्रकरणी सुनील लक्ष्मणदास मगनानी (वय ३२, रा. पिंपरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील यांचे शास्त्री चौकाजवळ कासारवाडी येथे सुखवानी पॅराडाईज येथे दुकान आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. काउंटरच्या खाली ठेवलेले ६५ हजार रुपये किमतीचे सिगारेट चोरट्यांनी चोरून नेले. रविवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक गाढवे तपास करत आहेत.