कासारवाडीतील १४ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर अत्याचार

1042

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार एक वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी घडला.

याप्रकरणी पिडीत १४ वर्षीय मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार मायाप्पा सीताराम झिटे (वय २८, रा. वाघोली) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मायाप्पा झिटे याने पिडीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एक वर्षापूर्वी पळवून नेले. तसेच तिच्यावर वेळोवेळी विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी मायाप्पा याला अटक केली आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.