कासारवाडीतील फ्लॅटला आग लागून १० लाखांचे नुकसान

125

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – फ्रीज कॉम्प्रेसरमधून गॅस लिकेज होऊन झालेल्या स्फोटात घराला आग लागली. या घटनेत घरातील दहा लाखांचे नुकसान झाले. ही घटना आज (रविवार) पहाटे पावणेदोनच्या सुमारास कासारवाडीतील सागर हाईट्स इमारतीमधील पाचव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणेदोनच्या सुमारास कासारवाडीतील सागर हाईट्स इमारतीमधील पाचव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये आग लागली. घरातील नागरिकांनी तातडीने बाहेर पडून अग्निशमन दलाला माहिती दिली. यावर मुख्य अग्निशमन केंद्र, भोसरी विभागाचे दोन बंब आणि एक देवदूत वाहन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. आणि अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले. यामध्ये घरातील फ्रीज, वॉशिंग मशीन, किचन मधील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. तसेच या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.