कासारवाडीतील ज्ञानराज शाळेतील विद्यार्थीनींकडून झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा

134

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – कासारवाडी येथील ज्ञानराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींनी परिसरातील झाडांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना राख्या बांधून शनिवारी (दि. २५) आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.

विद्यार्थीनींनी बांधलेल्या राख्यांवर झाडे लावा-झाडे जगवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, पाणी वाचवा-पक्षी वाचवा, असे सामाजिक संदेश देणारे व समाजप्रबोधन करणारी घोषवाक्ये लिहण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षिका सुवर्णा निकम यांनी केले.

यावेळी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब थोरात, कार्याध्यक्ष संजय शेंडगे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उर्मिला थोरात, प्राथमिक विभागाच्या प्रमुख स्नेहा काणेकर, माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.