काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या पथकावर हल्ला; ५ जवान शहीद

85

श्रीनर, दि. १२ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला आहे. अनंतनाग बस स्थानकाजवळ झालेल्या या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत.  तर एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.  या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गोळीबार सुरू होता.

एका दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बी / ११६ या बटलीयनवर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकावर हल्ला केला. ज्यामध्ये सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले.  या घटनेत एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे.  परिसरात  बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  जवानांना घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानने सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. शिवाय गोळीबारात एक जवान जखमी देखील झाला होता. पाकिस्तानच्या गोळीबारास भारतीय सैन्याकडून सडतोड प्रत्युत्तर देण्यात आले होते.