काळ्या जादूत यश मिळेल म्हणून शिष्याने केली गुरुची हत्या

171

केरळ, दि. ७ (पीसीबी) – काळ्या जादूत यश मिळेल म्हणून शिष्याने गुरु आणि त्यांच्या कुटूंबातील तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना केरळमधील इदुक्की जिल्ह्यात घडली.

अनिष असे हत्या करणाऱ्या शिष्याचे नाव आहे. तर गुरु कृष्णन यांच्यासहीत पत्नी सुशीला, मुलगी अर्शा, आणि मुलगा अर्जून यांची हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिष हा कृष्णन यांचा शिष्य होता. कृष्णन हा काळी जादू करायचा असे समजते. अनिषला मात्र हवे तसे यश मिळले नव्हते. गुरु कृष्णन यांच्यामुळेच त्याला यश मिळत नव्हते असा त्याचा समज होता. यामुळे त्याने कृष्णन याच्यासहित त्याची पत्नी सुशीला, मुलगी अर्शा आणि मुलगा अर्जून यांची हत्या मित्र लिबीश याच्या मदतीने केली. घरामागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सर्वांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी लिबीश याला अटक केली असून अनिष फरार आहे.